*आजही दुविधेतच.....!!!* *भाग आठ* किरणनं सपशेल नाकारनं सूर्याला काही पचलं नाही.त्याच्यासाठी हा जबरदस्त धक्का होता.त्या धक्क्यानं तो अधिकच भरकटला.दिवसेंदिवस तो कसा दिवस काढतो हे त्याचं त्यालाच कळत नव्हतं.योग्य-अयोग्य समजण्यास त्याची नक्कीच गफलत झाली हे त्याला कळून चुकलं होतं.सोबत असताना ती त्याच्या आयुष्यात चंद्रप्रकाशाप्रमाणे अंधारावर मात करावी तसेच तिनं त्याच्या मनाच्या वेदनेवर हळुवार फुंकर घालून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साथ देण्याचं अभिवचन दिलं होतं.आयुष्यभर साथ निभावण्याच्या आणाभाका घेतल्या होत्या.आता तिचेच शब्द तिला आठवत नाही.तिनं दिलेल्या वचनाची पूर्ण वाट लावली अनं त्याला वाऱ्यावर सोडून गेली.सूर्यानं कळत-नकळत तिच्या संगतीनं आयुष्य घालविण्याचं स्वप्न बघितलं होतं.क्षणिक स्वप्नाच्या नादात तो चांगल्या दिवसाला कायमचा मुकला होता.एका कवीच्या शब्दात सांगायचे झाल्यास.... "गुन्हा माझा नाही मी प्रेम तुझ्यावर केले माझ्या काळजातल्या दुःखे तुला कधी ना...