*प्रिती चा संघर्ष-----संपता संपेना* !!! *प्रा.डॉ.नरेश शं इंगळे* मु.भांबोरा ता.तिवसा जि., अमरावती मोबा.९९७०९९१४६४ ईमेल-nareshingale83@gmail.com रविवारचा दिवस. शहराकडून गावाकडे परत येत होतो.वाटेतच पावसाने झोडपले.मित्रासह ओलेचिंब झालो.वाटेतच माझी बालमैत्रीण प्रीतीचे गाव लागले.अचानक आम्ही तिच्या घरी पोहोचलो.प्रीती मुलाबाळांत रममान होती. आमच्या अचानक जाण्याने ती आश्चर्यचकित झाली. लगेच भानावर येत तिने आमचे आगत स्वागत केले.मी सहज तिच्या सांसारिक जीवनातील सुख दुःखाचे विचारणा केली ती जरा थबकली.अन अलगद पणे स्मितहास्य करीत सर्व काही ठीक असल्याचे सांगितले. मात्र तिला तिच्या मनातील वेदना लपवीता आल्या नाही. आणि तिच्या आयुष्यातील अविरत संघर्ष भराभर माझ्या दृष्टिपटलावर येण्यास वेळ लागला नाही. प्रीती बालपणापासूनच खेळकर, उत्साही, मेहनती चीवट वृत्तीची आणि सामाजिक जाणिवेची सुद्धा.गरिबी आणि हलाखीच्या स्थितीतही तिने परिस्थितीशी कडवी झुंज देत अथक प्रयत्नाने बरेच काही मिळविले आहे इतकेच नव्हे तर ती सर्व...